पुणे, 10 फेब्रुवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील भारतीय इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली. मंडळाकडून केल्या जात असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केलं. भारतीय इतिहास संशोधन मंडळाला खास भेट आणि देणगी दिली.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, भारतीय इतिहास संशोधन मंडळात येण्याची माझी पहिलीच वेळ आहे. हजारो वर्षाचा इतिहास या ठिकाणी जतन केला गेला आहे, बाकीकडे फक्त भूगोल आहे. इतिहास प्रत्येकांनी वाचला पाहिजे. ही सगळी संस्था मी आज पाहिली. माझ्याकडून काही तरी करावेसे वाटते म्हणून मनसेकडून आज या संस्थेला 25 लाख रुपयांची देणगी देत आहे. ही संस्था मोठी झाली पाहिजे, लोकांपर्यंत इतिहास पोचला पाहिजे. नुसते छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटले म्हणजे इतिहास होत नाही. आपल्या रक्तात अजून महापुरुष शिरायचे आहेत, आपण फक्त जातीतून महापुरुषांना पाहतो. आज तेच महाराष्ट्राचं राजकारण बनलं आहे.
लोकसभेसाठी मनसेत रणकंदन, वसंत मोरेंनी ते स्टेट्स का ठेवलं? INSIDE STORY
बाबरी मशीद पाडली तेव्हाची एक वीट राज ठाकरे यांच्याकडे होती. ती त्यांनी या मंडळाकडे सुपूर्द केली. त्याविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बाबरी मशीद पाडली तेव्हा आमचे नेते बाळा नांदगावकर तिथे उपस्थित होते, तेथील एक वीट त्यांनी आणली होती, ती त्यांनी मला भेट दिली. ती वीट तुम्हीही सर्वांनी पहा, आधीचे बांधकाम कसे होते बघा. एक हातोडा मारला आणि मशीद पडली असं नाही. मजबूत बांधकाम होते, तेव्हा टेंडर निघत नव्हते. ती वीट मी आज इतिहास संशोधन मंडळात देत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.